chandrashekhar Bawankule Team Lokshahi
बातम्या
राहुल गांधींनी आधी माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावं; चंद्रशेखर बावनकुळे
राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला.राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट जरी कोणाचा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा. असे बावनकुळे म्हणाले.