Chandrashekhar Bawankule : पहिल्या टप्प्यातील पाचही जागा महायुती जिंकेल

Chandrashekhar Bawankule : पहिल्या टप्प्यातील पाचही जागा महायुती जिंकेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी ग्रामपंचायत येथे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी आपल्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे. मला विश्वास आहे, की पहिल्या टप्प्यातलं सारे पाचही आमच्याकडच्या विदर्भातल्या सीट आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 51 टक्क्यांच्या मत वर घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील. असा मला पूर्ण विश्वास आहे. मोदीजींना मत देण्याकरता जनतेमध्ये उत्साह आहे. मला वाटतं की जनतेनं मतदारांनी प्रचंड मतदान करावं.

मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी. ही देशाची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे खूप मतदान व्हावं. पहिल्या टप्प्यातील पाचही जागा महायुती जिंकेल. असे चंद्रशेखर बावनकुळे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com