चांद्रयान-3 चे लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे; मिशन मून काउंटडाउन सुरू

चांद्रयान-3 चे लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे; मिशन मून काउंटडाउन सुरू

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)ने चांद्रयान-3 चे लँडर यशस्वीरित्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)ने चांद्रयान-3 चे लँडर यशस्वीरित्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले आहे. याचा अर्थ लँडर एकटाच पुढचा प्रवास करणार आहे. इस्रोच्या मते, लँडिंगसाठी येणारे 6 दिवस खूप महत्त्वाचे आहेत कारण येथे लँडरला अनेक महत्त्वाचे टप्पे प्रचंड वेगाने पार करावे लागतात.

चांद्रयान-3 चे लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे; मिशन मून काउंटडाउन सुरू
...तर आम्ही आपल्या बाजूने उभे राहू; आव्हाडांची शिंदेंना ऑफर?

इस्रोने सांगितले की, प्रोपल्शन मॉड्यूल या अक्षावर सतत फिरत राहील आणि पुढील अनेक वर्षे इस्रोला पृथ्वीबद्दलची अनेक महत्त्वाची माहिती देत ​​राहील. हा पेलोड पृथ्वीच्या वातावरणाच्या स्पेक्ट्रोस्कोपिक अभ्यासासाठी पुढील अनेक वर्षांची माहिती पाठवेल. पृथ्वीवरील ढगांची निर्मिती आणि त्यांची दिशा याबाबत अचूक माहिती देईल. अंतराळात घडणाऱ्या इतर घडामोडींची महत्त्वाची माहिती देऊ शकेल. यामुळे आगामी काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळेल, असे इस्त्रोने म्हंटले आहे.

प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर काय होईल?

इस्रोच्या म्हणण्यानुसार, प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होण्याच्या प्रक्रियेनंतर लँडरला चंद्राच्या दिशेने 90 अंश वळण घ्यावे लागेल. हे महत्वाचे आहे कारण यावेळी त्याचा वेग खूप असेल. यानंतरही आव्हाने संपणार नाहीत कारण लँडर चंद्राच्या सीमेत प्रवेश करेल, त्यावेळी त्याचा वेगही खूप जास्त असेल. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ लँडर डीबूस्ट करतील.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com