ताज्या बातम्या
Chandrayaan 3 चे चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश
14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळार कक्षेत प्रवेश केला होता.
14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळार कक्षेत प्रवेश केला होता. आता यान चंद्रापासून अवघ्या 153 किमी x 163 किमी इतक्या अंतरावर असल्याची माहिती नुकतीच इस्रोनं दिली आहे.चांद्रयान 3 चंद्रापासून काही अंतरावर असतानाच कमीत कमी वेळासाठी इस्रोकडून एक फायरिंग करण्यात आली.
या टप्प्यावरच चांद्रयानाच्या कक्षा कमी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने चंद्राच्या कक्षेत आज आणि उद्याचा दिवस महत्वाचा आहे. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे. प्रोप्लजन मॉड्युलपासून लँडिंग मॉड्युल 17 ऑगस्टला वेगळं होईल. त्यानंतर लँडिंग मॉड्युलला एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यासाठी इस्रोकडून मॅन्यूव्हर करण्यात येईल. आज चांद्रयान 3 ला 153km x 163km कक्षेत स्थापित करण्यात आलं आहे.