जोतिबाच्या नावानं चांगभलं! जोतिबा यात्रेचा उत्साह, भाविकांनी फुलला डोंगर

चैत्र यात्रा: जोतिबा डोंगरावर लाखो भाविक, 'चांगभल'च्या गजरात उत्साह
Published by :
Team Lokshahi

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. जोतिबा डोंगरावर दोन दिवसांपासून लाखो भाविक दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 'जोतिबाच्या नावानं चांगभल'च्या गजरात डोंगर दुमदुमला असून जोतिबा हे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधली ही यात्रा मोठी मानली जाते. गगनचुंबी सासन काठ्या गुलालाची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात यात्रेपुर्वीच डोंगर भाविकांनी फूलुन निघाला आहे. बैलगाडी, खाजगी वाहनातून पाई चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com