Mumbai Metro Breaking : मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका 7 आणि 2A मार्गावर मेट्रो बंद; जाणून घ्या कुठे कोणते बदल
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 च्या वेळापत्रकात आजपासून बदल करण्यात येणार आहेत. या सेवा 12 ते 18 ऑक्टोबर या काळात सकाळच्या वेळेत दीड तास विलंबाने सुरू होणार आहेत. दरम्यान सध्या दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर काशीगाव टप्प्याच्या एकत्रीकरणासह सुरक्षा चाचण्यांचे काम हाती घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मार्गातील दहिसर काशीगाव दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. या कामामुळे सकाळी 5 वाजून 25 मित्रांनी सुरू होणारी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गिकांवरील सेवा सकाळी 7 पासून सुरू होणार.
त्याचसोबत यलो लाईन डहाणूकरवाडीवरुन गुंदवलीला जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7.01च्या वेळेस सुटेल. तसेच शनिवार पहिली मेट्रो सकाळी 7 वाजता तर रविवारी सकाळी 7.04 वाजता धावेल.
तर दुसरीकडे दहिसर पूर्व येथून अंधेरी पश्चिमकडे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 6.58 मिनिटांनी पहिली मेट्रो धावेल. त्याचसोबत अंधेरी पश्चिम येथून गुंदवलीकडे जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7.01 वाजता धावेल. तर शनिवारी सकाळी 7.02 वाजता आणि रविवारी सकाळी 7.04 वाजता धावेल.