ताज्या बातम्या
'गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का?' प्रश्न विचारत भुजबळांची शरद पवारांवर टीका
बीडमध्ये आज अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. या सभेत हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अमरसिंह पंडित यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लावली आहे.
बीडमध्ये आज अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. या सभेत हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, अमरसिंह पंडित यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लावली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजित पवार हेच असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, अजितदादा तुमचे नेते आहेत तर त्यांना पाठिंबा देऊन टाका. पवारसाहेब तुम्ही काय बोलता?, हे आम्हाला समजतच नाही. आधी तुम्हीच सत्तेत सहभागाच्या बैठका घेत होतात. गुगलीमध्ये स्वत:चा गडी बाद करतात का?, असे अनेक प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.