… तर शरद पवार यांच्या घरासमोर उपोषणाला बसू; छगन भुजबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या समितीची आज प्रदेश कार्यालयात बैठक आहे. सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या बैठकीत नेमका काय ठराव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय नाही. पवार अध्यक्ष राहावेत असा ठराव मंजूर करणार. शरद पवार राजीनामा मागे घेण्यास तयार नाही झाले तर आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषण करू असे छगन भुजबळ म्हणाले.