नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, अपेक्षा तीच होती. कारण हेमंत गोडसे जे आहेत ते सध्याचे खासदार आहेत. म्हणून त्यांचा आग्रह जो आहे तो मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीसुद्धा धरला होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव जाहीर झालेलं आहे. हेमंत गोडसे यांचे मनापासून अभिनंदन करतो.

आतापासूनच जे आहे प्रचाराला जोरात, वेगात सुरुवात होईल. उद्या अर्थातच भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रमसुद्धा होईल. मुंबईमधूनसुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. मोठी मिरवणूक निघेल. त्या मिरवणूकीमध्ये संपूर्ण नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवेढे आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणूकीमध्ये सामील होतील. दिवस जरी कमी असतील तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघामध्ये प्रत्येकाला माहित आहे. नवीन चेहरा नाही आहे. 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणंसुद्धा सोपे जाणार आहे. त्यामुळे हे जे काय 15 - 16 दिवस आहेत. ते आम्ही पूर्णपणे ताकदीने प्रचाराचे काम हातात घेऊ.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू. ज्यावेळेला युतीचं काम असते किंवा सार्वजनिक काम असते. त्यावेळेला सगळ्यांचा मतानं काहीवेळा या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात. जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागते. संधी येतात, जातात. काम करत राहिलं पाहिजे. माझी खात्री आहे मी आणि माझ्याबरोबरचे माझे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत ते आता बाकीचा विचार मागे सोडून देतील आणि मजबूतीने आम्ही महायुतीच्या प्रचाराच्या कामाला वाहून घेणार आहोत. असे छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com