नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं.
यावेळी माध्यमांशी बोलताना आशा पवार म्हणाल्या की, सर्वांना चांगले सुखा सुखी वर्ष जाऊ दे, सगळे वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलं. तसेच पत्रकारांनी विचारले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे असं वाटतंय का? त्यावर उत्तर देत आशा पवार यांनी 'होय' असं उत्तर दिलं.
याच पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत असतात. यातच आता छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावे, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे. आम्हाला आनंद आहे.