नाशिक मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा रस्ता करण्याची छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

नाशिक मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा रस्ता करण्याची छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा अशी मागणी
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.

४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाश्यांचा वेळ यामध्ये जात आहे.

लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com