ताज्या बातम्या
Chhagan Bhujbal Meet Karad Family : डोक्यावरुन हात फिरवला अन् थेट उराशी कवटाळत...! भुजबळांकडून कराडच्या कुटुंबियांचे सांत्वन
छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या भरत कराड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
मंत्री छगन भुजबळ हे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह लातूरच्या वांगदरी गावात दाखल झाले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या 35 वर्षीय ओबीसी बांधवाने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती, आणि ओबीसी आंदोलकाने आयुष्य संपवलं.
छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या भरत कराड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी कराड यांच्या चिमुकल्यांना जवळ घेतले.
त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत, चिमुकल्या लेकराला छातीशी कवटाळून म्हणाले, 'काही कमी पडलं तर आम्ही आहोत'. तसेच भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही आपण घेत असल्याचे भुजबळ यांनी सांगितलं.