नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात? संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात? संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभेच्या निवडणुकासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून देण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीझर व्हायरल करण्यात आला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असताना छगन भुजबळा यांचा टिझर रिलीज करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, तयारी सगळेच करतात. मात्र त्यांना ती जागा मिळायला पाहिजे. त्यांची ती जागा अजित पवार देणार नाहीत ना. शरद पवार असते तर कदाचीत मिळाली असती. दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत. अजित पवार, भुजबळ यांचे नवीन. ते ठरवतील. जागा द्यायची की नाही. यांच्या हातात काय आहे. ना शिंदे यांच्या हातात आहे ना अजित पवार यांच्या हातात आहे. महाराष्ट्रामध्ये जागावाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरुनच निर्णय घेतलं जात होते.

आता शिंदेंना दिल्लीत जावं लागते. आता अजित पवार यांना दिल्लीत जाऊन बसावं लागते. आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचे तिकीट, उमेदवारी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला. आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवार साहेब यांच्या निवासस्थानी चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार - ठाकरे यांच्याकडेच आहे आणि ते राहिल. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com