छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक; कोण बाजी मारणार आज फैसला
Admin

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक; कोण बाजी मारणार आज फैसला

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कुणाचा विजय होणार याचा फैसला आज होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

सतेज औंधकर,कोल्हापूर

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कुणाचा विजय होणार याचा फैसला आज होणार आहे. चुरशीने 91 टक्के मतदान झाल्यानंतर आज रमणमळा याठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्या समर्थकांना पोलिसांनी थांबण्यासाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करून दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकत्र येणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतलीय. माजी मंत्री सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com