Chhatrapati SambhajiNagar : Mock Drill मध्ये भागवत कराड डॉक्टरच्या भूमिकेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Chhatrapati SambhajiNagar : Mock Drill मध्ये भागवत कराड डॉक्टरच्या भूमिकेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरक्षा सराव: छत्रपती संभाजीनगरमध्ये Mock Drills , भागवत कराड डॉक्टर भूमिकेत, नागरिकांनी घेतला सहभाग, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.
Published by :
Team Lokshahi
Published on

संभाव्य युद्धजन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापानाने समर्पित प्रशिक्षण देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक व्यापक मॉक ड्रिल Mock Drills चे आयोजन करण्यात आले. शहरातील वरदळीचा भाग असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी ही मॉक ड्रिल पार पडली. या उपक्रमात सुरक्षा दल, आपत्ती निवारण पथक, स्थानिक प्रशासन तसेच सामान्य नागरिकांचा सक्रीय सहभाग पाहायला मिळाला.

मॉक ड्रिलद्वारे युद्धसदृश परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, आपत्कालीन सेवा किती जलद प्रतिसाद देऊ शकतात, याचे वास्तवदर्शी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. संपूर्ण कार्यवाही अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. या मॉक ड्रिलचे सर्वाधिक आकर्षण ठरले ते भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव असलेले डॉ. कराड यांनी स्वतः डॉक्टरच्या भूमिकेत उतरून जखमींवर उपचार कसे करावेत, प्रथमोपचाराची प्रक्रिया कशी असावी याचे प्रभावी प्रदर्शन दिले. त्यांचा हा सक्रिय सहभाग नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला.

मॉक ड्रिलदरम्यान नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रशिक्षणात भाग घेतला. परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने अशा सरावाचे महत्त्व त्यांनी अनुभवले. यावेळी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, अशा प्रकारच्या मोहिमांमुळे आपत्ती काळात होणारे प्राण व मालमत्तेचे नुकसान टाळणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रमाणित व समर्पित तयारीमुळे शहर आपत्कालीन संकटांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर सामाजिक सहभाग आणि सजगतेचा सकारात्मक संदेशही सर्वत्र पोहोचवण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com