ताज्या बातम्या
Chhatrapati Sambhajinagar : वाढत्या तापमान लक्षात घेता वाघोबांना थंड कूलरची हवा
वाघोबांना उन्हापासून संरक्षण: छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयात कूलर सुरु
छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा वाढताच सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघोबांना थंडगार हवेसाठी कूलर सुरू करण्यात आलेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे कूलर सुरू ठेवण्यात येत आहेत. वाघोबांना उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून त्यांना सकाळी तीन तास आणि सायंकाळी दोन तास बाहेर सोडण्यात येत आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात वाघांसह साडेतीनशेहून अधिक प्राणी आहेत. उन्हाळ्यात या प्राण्यांची खास निगा राखावी लागतेय. सोमवारी शहराचे तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले. सकाळीच उन्हाची तीव्रता वाढलेली लक्षात येताच उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी तातडीने वाघोबांसाठी कूलर सुरू करण्याचे निर्देश दिले. प्राणिसंग्रहालयात ७ पिवळे आणि ५ पांढरे असे १२ वाघ आहेत. पिंजऱ्यात वाघोबा असताना त्यांच्यावर पाइपने पाण्याचा मारा देखील केला जात आहे.