MIMचा मोठा डाव! 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक, आजपासून उमेदवारी अर्ज सुरू
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर एमआयएमने आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष राज्यातील 12 जिल्ह्यांत उमेदवार उभे करणार असून, इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
पक्ष नेतृत्वाने सांगितले की, नगरपालिकांमधील यशामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतही पॅनलच्या माध्यमातून चांगले निकाल लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेतही सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, धाराशिव अशा जिल्ह्यांमध्ये उमेदवार देण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि समाजाशी जोडलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जाणार आहेत. उमेदवार निवडीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून अर्जांची तपासणी करून चर्चा केल्यानंतर अंतिम नावे जाहीर केली जातील. सर्व समाजघटकांना संधी देण्याची भूमिका कायम ठेवत एमआयएम जिल्हा परिषद निवडणुकीत उतरल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
थोडक्यात
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर एमआयएम आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहे.
2026 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष राज्यातील 12 जिल्ह्यांत उमेदवार उभे करणार आहे.
इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यास प्रक्रिया सुरू झाली आहे.

