छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. राज्यभर शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. किल्ले शिवनेरीवर आज शिवजयंतीचा सोहळा रंगणार आहे. शिवनेरीवर मोठा उत्सव असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय शिवजयंती सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता शिवजयंतीसाठी शिवनेरीवर दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर संध्याकाळी शिवजयंतीसाठी आग्र्यात दाखल होणार आहेत.
यासोबतच अभिनेता विकी कौशलचीही या शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थिती राहणार असून दिल्लीतही मोठा सोहळा रंगणार आहे. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीगण दिल्लीत दाखल होतील.