ताज्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना; पंतप्रधान मोदींनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला.
सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या तसेच विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता राजकोट पुतळा दुर्घटनेवरून मोदींची जाहीर माफी मागितली आहे. वाढवण बंदर भूमिपूजन कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. पंतप्रधान मोदींच्या पालघर दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलं.
आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो. तसेच शिवरायांना दैवत मानणारे कोट्यवधी शिवभक्त आहेत. त्या दुखावलेल्या शिवभक्तांचीही माफी मागत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)