Nitin Gadkari : “छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे 100टक्के सेक्युलर होते"

Nitin Gadkari : “छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे 100टक्के सेक्युलर होते"

कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झालं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झालं. या कार्यक्रमातून बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजी भाषेत येतं आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे. लहानपणपासून आमच्या आई वडिलांहूनही जास्त स्थान आमच्या हृदयात ज्यांच्याबाबत होतं त्या व्यक्तीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे."

"अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली. अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला ज्यानंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा असे आदेश त्यांनी दिले."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणं हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. " असे नितीन गडकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com