तुळशीच्या पानावर साकारली छत्रपती शिवाजी महाराज्यांची कलाकृती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाताने येथील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी तुळशीच्या पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती त्यांनी अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पुर्ण केली आहे. ही कलाकृती तयार करत असताना तुळशीच्या पानावर त्यांनी वॉटर कलरचा वापर करून ही कलाकृती तयार केलेली आहे.
या कलाकृती करण्याचा उद्देश असा आहे.आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचे महत्व फार आहे. तिला पवित्र मानले जाते. सर्वात सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे ही तुळस आहे. तसे अनेक जण रोज तुळशीचे पूजन देखील करतात. त्यामुळे त्यांनी जंयतीनिमित्त ही कलाकृती साकारली. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती कौशिक जाधव तयार करत असतात. वसईतील बर्वे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल वसई या संस्थेमध्ये ते कलाशिक्षक म्हणून काम करत आहे. अशा वेगवेगळ्या कलाकृती ते मुलांना शिकवत असतात. बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेब यांनी देखील या कलाकृतीचे कौतुक केले आहे. सोबतच कलाशिक्षक अभिमन पाटील सर व शाळेच्या प्राचार्या शोभना लॉईड वाझ मॅडम व शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनीही या कलाकृतीचे कौतुक केले आहे.