Chhattisgarh-Telangana
Chhattisgarh-Telangana

Chhattisgarh-Telangana : नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. (Chhattisgarh-Telangana ) छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवरील कर्रेगुट्टालू हिल्सवर सुरक्षा दलाची तुकडी व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 31 कुख्यात नक्षलवादी ठार झाले आहेत.

छत्तीसगडसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नक्षलवादी संघटनांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम सुरू केली असून नक्षलवाद्यांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोस्ट करून या कारवाईची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com