Accident News
Accident NewsTeam Lokshahi

छत्तीसगड पोलिसाचा आंबोली घाटात दरीत कोसळून मृत्यू, कर्नाटक निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी होता तैनात

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड रिझर्व पोलिसांची एक तुकडी कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आली होती.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रायबागमध्ये आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा आंबोली घाटातील ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगड रिझर्व पोलिसांची एक तुकडी कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आली होती. यादरम्यान काही काळ सुट्टी मिळाल्याने या तुकडीतील पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्याहून परतत असताना यापैकी तिघे जण आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. यावेळी मितीलेश पॅकेरा हे दरीच्या दिशेने जात असताना त्यांचा तोल गेल्याने ते जवळपास ३०० फूट खोल दरी कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती लगेच आंबोली पोलिसांना दिली. काही वेळातच आंबोली पोलीस रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मितीलेश यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.

Accident News
त्या काळातही शरद पवार यांनी मणिपुर मध्ये अडकेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केली मदत

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ते मितीलेश यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करत आहेत. तसेच मितीलेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com