सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज मुंबई दौऱ्यावर
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. उच्च न्यायालयायाच्या नव्या इमारतीची आज पायाभरणी होणार असून या नव्या उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील जमिनीवर उच्च न्यायालय उभारण्यात येणार आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्जल भूयान, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्यासोबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
उच्च न्यायालयायाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सरन्यायाधीशांच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आल्याची माहिती मिळत असून रामकृष्ण परमहंस मार्ग, जेएल शिर्सेकर मार्ग यांना जोडणारा न्यू इंग्लिश स्कूल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोडचा पर्यायी वापर करता येणार आहे. यासोबतच रात्री 9 नंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.