Chief Justice of India : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंच्या सत्कारावेळी पाणावले आईचे डोळे; सरन्यायाधीशांनी बाबासाहेबांनाही वाहिली श्रद्धांजली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज, रविवारी महाराष्ट्राचा दौरा केला.
Published by :
Rashmi Mane

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज, रविवारी महाराष्ट्राचा दौरा केला. दौऱ्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, "देशाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर आज माझा महाराष्ट्राचा पहिलाच दौरा आहे आणि आज मी चैत्यभूमीवर, जिथे बाबा साहेबांचे स्मारक आहे, आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकता ही मूल्ये पुढे नेण्यासाठी आणि जतन करण्यासाठी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज येथे आलो आहे."

दरम्यान, भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार काउन्सील ऑफ महाराष्ट्र - गोवातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीशांची आई कमलाताई गवई यांचे डोळे पाणावले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com