Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची सहकुटुंब धार्मिक स्थळांना भेट; ट्वीट केला प्रयागराज दौऱ्यातील व्हिडीओ
महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक उत्सव असल्याच म्हटलं जात. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या कुंभमेळ्यामध्ये ९ कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी झाले आहेत. २६ फ्रेब्रुवारी रोजी महाकुंभमेळा समाप्त होणार आहे.
या महाकुंभमेळ्यात दिग्गंज नेत्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासोबत प्रयागराज आयोजित कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले. यावेळी देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा होत्या. फडणवीसांनी आपला अधिकृत व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हनुमान चालिसा बोलताना दिसत आहेत.