Devendra Fadnavis : "इथे कुणी कुणाचे शत्रू नाही" शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
"फडणवीसांची गती पाहून मला आश्चर्य वाटते" या शरद पवार यांच्या मतावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनासाठी मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा आभारी आहे.आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत, कुणी कुणाचे शत्रू नाही. शरद पवार साहेबांनी असे शब्द माझ्यासाठी वापरणे त्यांचा मोठेपणा" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच पुढे माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शासनाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथा ती मला असं वाटतं मंत्र्यांनी असं वक्तव्य करणे अतिशय चुकीचं आहे. पिक विमा संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्यांची पद्धत बदलली.