मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या पिचवर जोरदार फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या पिचवर जोरदार फटकेबाजी

ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ . टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रिकेट स्पर्धेला रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, टेम्भी नाका बाळासाहेबांची शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, जॅकी भोईर, नितेश पाटोळे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com