Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

जिंदाल कंपनीच्या आगीत ११ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीला मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे.
Published by :
shweta walge

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीला मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. कंपनीमध्ये मोठ्या धुराचा लोळ पाहायला मिळाला या आगीमध्ये अनेक जण जखमी झाल्याचं माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मी घटनास्थळी जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग यांची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले असून, आतमध्ये अडकलेल्या लोकाचं बचावकार्य सुरु आहे. या घटनेत अकरा लोक जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सुयश रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कंपनीतील काही कामगार अडकले आहेत. अग्निशमन दलाचे बचावकार्य आणि शोधकार्य अद्याप सुरू आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये बोलताना दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com