एकनाथ शिंदे हा सर्व सामान्य कार्यकर्ता आहे, मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नाही - मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे हा सर्व सामान्य कार्यकर्ता आहे, मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नाही - मुख्यमंत्री

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून त्यामुळे काही भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनतेचे मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर आधारित एक वेगळं चित्र निर्माण करुन कष्टकरी बांधव मूलभूत प्रश्न यापासून बाजूला कसा राहिल, याची काळजी घेतली जात आहे. असे शरद पवारांनी टीका केली होती.

यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे शेतकऱ्यांचे राज्य असून यांच्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एकनाथ शिंदे हा सर्व सामान्य कार्यकर्ता आहे, मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नाही. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com