बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत.अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखिल साधणार आहेत.