मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 एप्रिलला अयोध्या दौरा; मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 एप्रिलला अयोध्या दौरा; मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्याला रवाना होणार आहेत. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे.

ठाण्यातून आयोध्यासाठी आज दुपारी 4 वाजता ट्रेन निघणार आहे. या ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड, नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत.

Admin

शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत पोहोचणार असून रामललाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com