मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला रवाना होणार; वाचा असा असेल मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा
Admin

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला रवाना होणार; वाचा असा असेल मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री रविवारी रामलल्ला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत.

शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. अयोध्येत धनुष्यबान असलेले अनेक बॅनर्स लागले असून आजूनही बॅनर्स लावण्याच काम शिवसैनिकांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड, नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत. ठाण्यातून आयोध्यासाठी आज दुपारी 4 वाजता ट्रेन निघणार आहे.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा

संध्या. 5.30 वा. मुख्यमंत्री शिंदे विमानाने लखनऊला रवाना

संध्या. 7.45 वा. लखनऊ विमानतळावर आगमन

लखनऊतील शासकीय विश्रामगृहावर रात्री मुक्काम

9 एप्रिल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अयोध्येत दाखल होणार

दुपारी 12 वाजता श्रीरामाची महाआरती करणार

दुपारी 12.20 वाजता राम मंदिराच्या कामाची पाहणी करणार

दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

दुपारी 3 अयोध्येतील लक्ष्मण किल्ल्याला भेट देणार

संध्याकाळी 6 वाजता शरयू नदीवर महाआरती

रात्री 9 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकनाथ शिंदे भेट घेणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com