19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टपाल केंद्र सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टपाल केंद्र सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टपाल केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टपाल केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरिकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी हे टपाल केंद्र सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांचे टपाल, निवेदने स्वीकारून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com