Ladki Bahin Yojana : मोठी अपडेट! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
Ladki Bahin Yojana : मोठी अपडेट! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्यLadki Bahin Yojana : मोठी अपडेट! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य

Ladki Bahin Yojana : मोठी अपडेट! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठ वक्तव्य

सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या, पण पात्र नसलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. काही महिलांनी सरकारी नोकरी करत असताना देखील या योजनेचा फायदा घेतला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू

  • या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यात जमा केले

  • या योजनेला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे,

राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यात काही महिलांची नावं वगळली जात आहेत.

सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या, पण पात्र नसलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. काही महिलांनी सरकारी नोकरी करत असताना देखील या योजनेचा फायदा घेतला आहे. यामुळे सरकारने अशा अपात्र महिलांची नावं वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

तरी विरोधकांचा आरोप आहे की, या योजनेला लवकरच बंद करण्यात येईल. त्यात काही महिलांची नावं वगळली जात असल्याचं दाखवून विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. विरोधकांचा आरोप आहे की, ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आम्ही सुरू केलेली कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजित पवार आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहील."

फडणवीस यांनी 2026 नंतर शेतकऱ्यांना 365 दिवस 12 तास वीज देण्याचा आणि पाच वर्षे मोफत वीज देण्याचा देखील आश्वासन दिलं आहे. योजनेच्या अपात्र महिलांची नावं वगळण्यासाठी सरकारकडून केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com