Devendra fadnavis  : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया,काय म्हणाले?

Devendra fadnavis : महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया,काय म्हणाले?

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर यात आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापलं

  • या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया

  • देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर यात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्ंयाच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले जात आहेत. आता या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले. परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, ज्यांचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटकही केली. त्यातलं सर्व सत्य हे बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय घेतला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवायचं, अशाप्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजित दादा, सचिन दादाचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करुन मी या ठिकाणी आलो नसतो. अशा गोष्टीत मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहेत, तिथे मी काहीच तडजोड करत नाही. पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक गोष्टीत जर राजकीय भूमिका कोणी घेत असेल तर तेही मी सहन करणार नाही. त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील तुम्ही समजून घ्या, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com