जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवार यांचे पुण्यात बॅनर

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवार यांचे पुण्यात बॅनर

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता कोथरूडमध्ये लागलेल्या बॅनर्समुळे या चर्चांना उधाण आलं आहे.अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असं बॅनरवर लिहिले आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवार यांचे पुण्यात बॅनर
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल; अजित पवारांनी सांगितली 'मन की बात'
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com