काँग्रेसला पुन्हा झटका? आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर

काँग्रेसला पुन्हा झटका? आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर

महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याच समोर आलं आहे.
Published by :
shweta walge

महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आता आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याच समोर आलं आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक्स (ट्विटर)वरुन काँग्रेस पक्षाचं नाव काढले आहे, त्यामुळे या वृत्ताला आणखी बळ मिळाले आहे. इतकंच नाही तर कमलनाथ आजच दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा (VD Sharma) यांनी कमलनाथ यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्यप्रदेशमधील कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. कमलनाथ यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारं खुली आहेत.

काँग्रेसला पुन्हा झटका? आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
Sharad Pawar : पक्ष आणि चिन्हाबाबत सेटलमेंट करुन निर्णय घेतला गेला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com