China Accident
China AccidentTeam Lokshahi

चीनमध्ये हृदयद्रावक रस्ता अपघात; धुक्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळल्या, 17 जणांचा मृत्यू

चीनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाल्याची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे समोरील दृष्य न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाल्याच समोर आले आहे.

चीनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाल्याची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे समोरील दृष्य न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाल्याच समोर आले आहे. या अपघातात तब्बल १७ जणांनी जीव गमावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात 22 जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिआंगशी प्रांतातील नानचांग शहराच्या बाहेरील भागात हा अपघात दुपारी 1 च्या आधी घडला. येथील लोकांना वाहन चालवताना त्रास होत असल्याचे तपासात समोर आले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता नगण्य असल्याने असे अपघात होत आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना सावकाश आणि सावकाश वाहन चालवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या अपघातात किती किंवा कोणत्या प्रकारची वाहनं अपघातग्रस्त झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या या अपघाताचं कारण तपासलं जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

China Accident
Pakisthan crisis: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गंभीर; खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com