US vs China Trade War : अमेरिकेवर चीनने लादला 84 टक्के वाढीव आयात कर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. टॅरिफचा परिणाम अनेक देशांच्या शेअर बाजारावरही होत आहे. यातच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चिनी आयातीवरील 104 टक्के शुल्क लादल्यानंतर आता चीननेही अमेरिकन वस्तूंवर 84 टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.
चीनवर आधी अमेरिकेने 34 टक्के आयात शुल्क लावलं होतं. त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी 34 टक्के आयात शुल्क लावलं होतं. यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा चीनी मालावर 104 टक्के आयात शुल्काची घोषणा केली. परिणामी, आता चीननेही अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प प्रशासनाने चिनी आयातीवरील 104 टक्के शुल्क लादल्यानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर 84 टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केल्यामुळे याचा फटका आता जगभरातील आणखी काही देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका आणि चीनमधील हे टॅरिफ वॉर आणखी तीव्र होत असून याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.