Ind vs Pak : 'भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार'; अमेरिका भारताच्या पाठिशी, तर पाकिस्तानला चीनचे समर्थन
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी गुरुवार, १ मे २०२५ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांचा देश भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा देतो, असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांना सांगितले की, पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक बदमाश देश म्हणून उघड झाला आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, चर्चेदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, जग आता दहशतवादाकडे डोळेझाक करू शकत नाही.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये राजनाथ सिंह यांच्या विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली आहे. यात हेगसेथ म्हणाले की, अमेरिका भारतासोबत एकजुटीने उभा आहे आणि भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला अमेरिकन सरकारचा भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
चीनचे राजदूत जियांग झेडोंग यांनी गुरुवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. या काळात चीनने पाकिस्तानला पाठिंबा देण्याबद्दल बोलले आहे. यापूर्वीही, शाहबाज शरीफ यांच्या विधानाचे समर्थन करत, चीनने पहलगाम हल्ल्याच्या स्वतंत्र चौकशीला पाठिंबा दिला होता. चीन नेहमीच पाकिस्तानी दहशतवाद्यांना संरक्षण देत आला आहे.