China Thanks India : चीनसाठी भारतीय नौदल ठरलं देवदूत! "थँक यू इंडिया" बोलत मानले आभार

China Thanks India : चीनसाठी भारतीय नौदल ठरलं देवदूत! "थँक यू इंडिया" बोलत मानले आभार

भारताला पाण्यात पाहणारा आणि सतत टीका करणारा चीन भारतीय नौदलाच्या या कामगिरीमुळे भारताचं कौतुक करताना आणि आभार मानताना दिसून आला.
Published by :
Prachi Nate
Published on

भारताचा कट्टर शत्रू म्हणजे चीन आणि पाकिस्तान, आता नुकतचं झालेल्या जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानची बाजू घेत त्यांना मदत केली. मात्र शत्रूलाही आभार मानावे लागतील असं काम भारतीय नौदलानं केलं आहे. चीनने चक्क भारताचे आभार मानले आहेत. 9 जून रोजी केरळच्या नॉटिकल मैल दूर समुद्रात MV Wan Hai 503 या नावाच्या मालवाहू जहाजाचा मोठा अपघात झाला. या जहाजात स्फोट झाल्यामुळे जहाजात आग पसरली. या जहाजात एकूण 22 जण होते, ज्यात 14 चिनी, 5 म्यानमारचे तर 3 इंडोनेशियन असे लोक होते. आगीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे जहाजात असणाऱ्या लोकांकडे बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग उघडा दिसत नव्हता.

यावेळी भारतीय नौदलाला या घटनेची माहिती मिळताच चिनी नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने पूर्ण ताकद पणाला लावून धावून आलं. केरळमधील समुदात पेट घेतलेल्या MV Wan Hai 503 या मालवाहू जहाजातील लोकांना वाचवण्यासाठी आयएनएस सुरत या जहाजाने एक डोर्नियर विमान जहाडावरील लोकांच्या मदतीसाठी पाठवलं. यावेळी सी-144 विमान आणि पाच मोठी जहाजं MV Wan Hai 503 जहाजावरील लोकांना वाचवण्यासाठी ताकदीन प्रयत्न करत होते.

त्यावेळी भारतीय नौदलाने जहाजावरील 22 जणांचा जीव वाचवला. भारताला पाण्यात पाहणारा आणि सतत टीका करणारा चीन भारतीय नौदलाच्या या कामगिरीमुळे भारताचं कौतुक करताना आणि आभार मानताना दिसून आला. भारतातील चीनचे राजदूत यू जिंग यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, " मी भारतीय नौदलासह मुंबई तटरक्षक दलाचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही आमच्या लोकांचा जीव वाचवला आहे. यू जिंग यांची ही पोस्ट पाहून भारताचा अभिमान वाढला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com