Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाचे टेन्शन वाढलं; 'या' नेत्याने दिला राजीनामा
Admin

Chinchwad By-Election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाचे टेन्शन वाढलं; 'या' नेत्याने दिला राजीनामा

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजपाचे टेन्शन वाढलं आहे. पिंपरी निखल परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नगरसेवक तुषार कामटे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर तुषार कामटे यांनी भाजपावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप करत असलेला भ्रष्टाचाराला कंटाळून मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

तुषार कामटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com