भाजपाला मोठा धक्का! माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपाला मोठा धक्का! माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बुधवारी (१५ फेब्रुवारी) रोजी भाजपाला रामराम ठोकलेले चिंचवडचे माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज संध्याकाळी प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

तुषार कामठे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर खूपच नाराज होते.त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढाईत साथ दिल्याने कामठेंनी प्रथम नगरसेवकपदाचा राजीनामा वर्षापूर्वी दिला.पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला,हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. चिंचवड पोटनिवडणुकीच्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com