Chitra  Wagh
Chitra WaghTeam Lokshahi

...तर अशा 56 नोटीशीत आणखी १ची भर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

अभिनेत्री उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती.
Published by :
shweta walge

अभिनेत्री उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यावरुन रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अवमान केला आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली असल्याचे सांगितले. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर, तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली.

राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..!. असो…छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार, असे त्यांनी म्हंटले आहे,

महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस

महिला आयोग गेल्या ३० वर्षांपासून काम करते आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी महिला आयोगासाठी काम केलं आहे. त्यामुळे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे खोटे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच चित्रा वाघ यांनी याप्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करेन, असेही त्या म्हणाल्या.

Chitra  Wagh
चित्रा वाघ बालिश; राज्य महिला आयोगाने त्यांनाच पाठवली नोटीस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com