Chitra Wagh : 'हिंदूंचा द्वेष करण्याची काँग्रेसची खेळी, समूळ उच्चाटन करू, या निवडणुकीच्या वेळी'
अमित शाह यांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात स्नान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाकुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाहांवर टीका केली आहे. गंगेमध्ये स्नान केल्याने देशातील गरिबी दूर होणार आहे का? असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, हिंदूंचा द्वेष आणि सनातनची टिंगल. देशद्रोही काँग्रेसला दुसरे जमते काय ? प्रयागराज येथील 'महाकुंभ' मध्ये करोडो श्रद्धाळू आणि भाविक सामील होत आहेत, पवित्र स्नान करीत आहेत. आधी त्यांच्यापुढे नतमस्तक !
नेहमीप्रमाणे हिंदूंची आणि सनातन धर्माची टिंगल, चेष्टा करण्याची आणि मजाक उडवण्याची संधी देशद्रोही काँग्रेस पक्षाने साधली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या 'महाकुंभ' ची खिल्ली उडवली आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते.
त्यांचे हेच उद्गार हज यात्रा किंवा इफ्तार पार्टीलाही लागू होतात. त्यावेळी असे उद्गार काढण्याची हिंमत आहे का या देशद्रोही काँग्रेसवाल्यांची ? हिंदूंचा द्वेष करण्याची काँग्रेसची खेळी, समूळ उच्चाटन करू या, निवडणुकीच्या वेळी ! असे चित्रा वाघ म्हणाल्या.