Dinesh Phadnis Death: 'CID'फेम अभिनेते फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन

Dinesh Phadnis Death: 'CID'फेम अभिनेते फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन

CID Fame Dinesh Phadnis Death: 'सीआयडी' या मालिकेत 'फ्रेड्रिक्स'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

Dinesh Phadnis Passed Away: 'सीआयडी' या मालिकेत 'फ्रेड्रिक्स'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दिनेश 57 वर्षांचे होते. दिनेश फडणीस मल्टिपल ऑर्गन फेल्योरमुळे कांदिवलीच्या तुंगा रुग्णालयात रात्री 12 वाजून 08 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात 1 डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं म्हटलं जात होतं, पण कालच दयानंद शेट्टीने हे वृत्त फेटाळलं होतं. त्यांचं लिव्हर डॅमेज असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बोरीवली पूर्वच्या दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निवासस्थानी CIDची संपूर्ण टीम दाखल झाली आहे. त्यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com