ताज्या बातम्या
CIDCO| मुदत संपत आली, किमती कधी जाहीर होणार?
सिडकोच्या घरांच्या अर्ज नोंदणीसाठीची मुदत संपत आली आहे, मात्र अद्याप घरांच्या किमती जाहीर झालेल्या नाहीत. ग्राहक किमती कधी जाहीर होणार याची वाट पाहत आहेत.
सिडकोच्या घरांच्या अर्ज नोंदणीसाठीची मुदत संपत आली आहे, मात्र अद्याप घरांच्या किमती जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे, किमती कधी जाहीर होणार? असा प्रश्न वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेले ग्राहक विचारत आहेत.
'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेंतर्गत सिडकोने २६ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. विशेष म्हणजे, अर्ज नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहक अद्याप या प्रकरणात अनिश्चिततेत असून, किमती जाहीर होईपर्यंत ते वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेतच आहेत.