Cidco lottery : घराचे स्वप्न साकार होणार; सिडकोच्या घरांची आज सोडत निघणार

Cidco lottery : घराचे स्वप्न साकार होणार; सिडकोच्या घरांची आज सोडत निघणार

सिडकोच्या घरांची आज सोडत निघणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सिडकोच्या घरांची आज सोडत निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या दिवशी सिडको महामंडळातर्फे 21399 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेतील 26 हजार घरांसाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत होणार आहे.

सिडकोच्या 26 हजार घरांसाठी 21 हजार 399 अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी 1 वाजता सोडत निघणार आहे.

सिडकोनं नवी मुंबईतील विविध ठिकाणावरील घरांच्या विक्रीसाठी 12 ऑक्टोबर 2024 ला 26000 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com