वर्ध्यातील बांगडापुरात नागरिकांचा रास्तारोको
भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातील बांगडापूर येथे वाघिणीने पशुपालकाला ठार केले ही घटना ताजी असताना आज सकाळी दिवसाढवळ्या रस्त्याच्या कडेला डोबऱ्यात पाणी पीत असताना वाघिणीने बैलावर हल्ला केला. यात पंकज अवथळे यांचा बैल जागीच ठार झाला.यावेळी त्याठिकाणी असलेला युवक त्याठिकाणावरून पळून गेल्याने थोडक्यात बचावला.
ही घटना गावात पसरताच नागरिकांनी जमाव करत महिला व नागिरकांनी कोंढाळी खरांगणा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले ,यावेळी नागरिकांनी वाघिणेचे वाढत्या हल्लाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली. नागरिकांना केलेल्या आंदोलन स्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्यासह पोलीस कर्मचारी भेट दिली. नागरिकांचे सांत्वन करून बैलाची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत तात्काळ धनादेश देत असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्यात आले.
'त्या' कर्मचाऱ्यांना नागरिकांनी झाडाला बांधले
वाघिणीच्या हल्ल्यात पशुपालकाचा मृत्यू झाल्याने त्याठिकाणी वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहचले नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्याला नागरिकांनी रोषाला समोर जात नागरिकांना चक्क कर्मचाऱ्याला झाडाला बांधले यावरून नागरिकांत किती रोष होता या घटनेवरून दिसत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर बांधले तर बरं होईल मात्र लहानश्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी बांधले तर त्याचा कुठेही फायदा होणार नाही अशी चर्चा या आंदोलन स्थळी ऐकायला मिळाली.
'स्वामी' राहतात कुठे तुम्ही?
कारंजा ,आष्टी, तळेगांव या वनपरिक्षेत्र करिता सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे.त्याकरिता त्यांच्या निवासस्थान व कार्यालय कारंजा वनविभाग कार्यालयात बांधण्यात आले आहे. येथे राहून त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेमणूक असताना येथील सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी वर्धा येथे राहून गाडा हाकतात. दोन्ही दिवस स्वामी नावाचे अधिकारी हे घटनास्थळी उशिरा पोहचल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला होता. आजही ते घटनास्थळी उशिरा पोहचले होते, त्यानंतर उपस्थित नागरिकांनी स्वामी साहेब राहतात तरी कुठे असा प्रश्न नागरिकांत एकमेकात चर्चा करत होते.
वाघीण पकडायला लावला पिंजरा
कारंजा तालुक्यात वाघीणीने पशुपालकाला ठार केले,आज बांगडापूर येथे पुन्हा बैलाला ठार केले त्यानंतर नागरिकांचा वाढता रोष बघता वाघिणीला पकडण्यासाठी पिंजरा आणण्यात आला.तो लावण्यात आला असून याला परवानगीचा आदेश कोणी दिली, हा प्रश्न आता समोर आला आहे. वाघीणीला पिंजऱ्यात अडकून वनविभाग करणार तरी काय? लोकांचा रोष बघता या दिखावा तर केला नाही ना?